'दुखावले जाणे' हाच जर स्वभाव असेल तर? हेटाळणीच्या एका शब्दानेही नाव हेलकावे खाऊ लागते तेव्हा काय करावे?
कुणी चिडून उठतात तसेच चिडावे की शांत रहावे? बरं हे 'शांत' रहाणं दिखावू नकोय ना! त्यापेक्षा कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नये हेच उत्तम ,नाही का!पण पण पण….
हे असं अगदी स्वतःच्या मूळ स्वभावाविरुद्ध जाणं जमेल का? मग हेच उत्तम की थोडा वेळ जाऊ द्यावा आपल्या रागाला आणि दुःखाला निवू देण्यासाठी.. हे नाहीच ना स्वभावाविरुद्ध? नाही!मग तसंच करावं.. पण पण पण…
तरीही जर पुन्हा हेच होत राहिलं तर? हळू हळू होऊच की आपणही मोठे… केव्हातरी! चूक-बरोबर न बघता फक्त आपल्या रागाच्या तालावर नाचण्याइतके! कुणाचा विचारही न करण्याइतके.. स्वार्थी,अहंकारी.. मग पहायची असं होण्याची वाट?…
नाही… असं होऊ द्यायचंच नाहिये ना… मग पाहू थोडी वाट उद्याच्या पहाटेची…
ह्म्म. आवडल लिहिलेल. तो दुसरा ब्लॉग पण छान आहे.:)
Comment by rga — May 26, 2006 @ 7:18 pm