तरंग

July 11, 2006

मन दौडने लगता है…..

Filed under: Uncategorized — Giriraj @ 12:27 pm

आपली मनःस्थिति आपल्यालाच व्यक्त करता येत नाही. अश्या वेळेस मनाची अगदी चरफ़ड होत असते.

आणि मग अचानक एखादी कविता नाहीतर एखादं गीत आठवतं…

तसंच हेही एक…

कई बार यू भी देखा है

ये जो मनकी सीमारेखा है

मन तोडने लगता है

अनजानी प्यास के पीछे

अनजानी आस के पीछे

मन दौडने लगता है!

April 27, 2006

ट्रॉय

Filed under: Uncategorized — Giriraj @ 9:37 am

ट्रॉय

'होमर' या जगप्रसिद्ध ग्रीक कविचे एक अजरामर महाकाव्य 'इलियड' आहे्ओमर स्वत आंधळा होता असे म्हटले जाते. 'ओडिसी' नावाचे अजून एक महाकाव्य होमरच्या नावावर आहे. या दोन्ही काव्यांचा संदर्भ आहे ट्रॉय म्हणजेच इलियम च्या युद्धाशी. इलियड मध्ये युद्धाचे वर्णन आहे तर ओडिसी मध्ये 'ओडिसियस' या योद्ध्याचे विजयी होऊन परत येण्याचे वर्नन आहे. मूळ काव्यात म्हणे देवादिकांचीही वर्नने आहेत. देवताही या युद्धात तटस्थ राहू शकल्या नव्हत्या.
ट्रोय या चित्रपटाची कहाणि अर्थातच या नगरीवरील विजय आणि तिच्या विद्ध्वंसाची कहाणी आहे. चित्रपटाची कथा मुख्यत फ़िरते ती ऍकिलीज़ आणि राजा हेक्टर यांच्याभोवतीच. कोणत्याही र्‍राष्ट्राशी निष्ठा नसलेला ऍकीलीज़ अर्थातच indivisualist दाखवला आहे तर हेक्टर एक आदर्श राजा,मुलगा,भाऊ,पति दाखवला आहे. अगदी सुरवातिपासूनच दोघा श्रेष्ठ योद्ध्यांच्या स्वभावातले भेद ठळकपणे समोर येत राहतात. युद्धाच्या विरोधात अस्णारा हेक्टर केवळ अपल्या भावासाठी आणि नंतर राज्यासाठी लढायला तयार होतो. तर दुसर्‍या बाजूला केवळ स्वतसाठीच लढणारा थंड डोक्याचा ऍकिलीज़ आपलं नाव अजरामर व्हावं या एका कारणासाठीच लढत असतो. युद्धाची पार्श्वभूमी त्यानंतर त्याची तयारी या प्रस्तावनेत चित्रपट पुढे सरकत
जातो. यात चित्रपट लांबला नसून पुढे होणार्‍या प्रसंगांची दाहकता अधोरेखित होत जाते. हेक्टरचे श्रद्धाळूपण,त्याचा पत्नि आणि मुलांबरोबरचा वेळ,त्याचे वडीलांशी होणारे संवाद अगदी पहात रहावेसे वाटतात. इकडे ऍकिलीज़ देवतांवरही राग खाऊन असतो.
मुळ युद्धा आधीच ऍकिलीज़चा दूरचा भाऊ मारला जातो. शेवटी युद्ध सैनिकांमध्ये न लढवता केवळ दोन्ही बाजूच्या श्रेष्ठ योद्ध्यांमध्येच व्हायचं ठरतं. ज्या पॅरीसमुळे हे सगळं घडतं त्याला मात्र शेवटी न लढवता हेक्टरच उतरतो लढायला आणि दुसर्‍या बाजूला असतो हेक्टरच्या बहीणीला वाचवणारा ऍकिलीज़. दोघांच्या य्द्धाचा प्रसंग या चित्रपटाचा कळस आहे. पार्श्वसंगीत तर काय जमलय या प्रसंगात! एकेक प्रसंग उत्कंठा वाढवत नेतो. दगडाला ठेचाळून हेक्टर खाली पडतो आणि त्या वेळेला त्याच्या बायकोने हाय खाल्लेली स्थिति फ़ारच करूणतेने दाखवली आहे. ऍकिलीज़ अर्थातच वरचढ ठरलेला असतो. हेक्टरच्या मृतूचा
प्रसंग की ज्यात ऍकिलीज़ त्याला भाला मारून ज़मीनदोस्त करतो अतिशय परीणमकरक झालाय. पुढे जगप्रसिद्ध 'त्रॉजन हॉर्स'चा प्रसंग आणि ट्रॉयचा विध्वंस नंतर ऍकिलीज़चा मृत्यू,हेक्टरच्या बहीणीचे दोन्ही विश्व उद्द्वस्त होणे हे सगळेच प्रसंग तितकेच परीणामकारक आहेत.

का म्हणून माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?ज्यांचा कधी प्रत्यक्ष संबंध नसतो असे सैनिक कोणत्या भावनेने अनोळखी माणसांना मारत सुटतात?मला नेहेमी पडणारे हे प्रश्न हा चित्रपट पाहतांना पुनःपुन्हा समोर येत राहतात. मी अजूनच युद्धविरोधी झालो हा चित्रपट पाहून!


ग्लॅडिएटरपेक्षा मला हा चित्रपट खूपच आवडला. कलाकारांचे म्हणाल तर हेलेनची भूमिका तशी निमित्तमात्रच होति. ऍकिलीज़ची भूमिका ब्रॅड पिटने तितक्याच थंडपणे साकारली आहे. मी त्याचा एकही चित्रपट या आधी
पाहिला नव्हता. त्याची पिळदार शरिरयष्टी तर हेवा वाटावी अशीच आहे. (मी पुन्हा जिम सुरू केली त्यामुळे)!सर्वात उत्तम भूमिका केली अर्थातच एरीक बाना ने!त्याच्या कॅरेक्टरला वाव अधिक होता आणि सहानुभूतिही त्याच्याच बाजूने जाणारी असली तरीही त्यात एरीकचा वाटा मोठाच आहे.

फ़ार पूर्वी रशियन पुस्तक प्रदर्शनि लागत असे. त्यात 'प्राचीन विश्व इतिहास का परीचय' नावाचं अनुवादित पुस्तक मी घेतलं होतं. त्यात या प्रसंगांचं सचित्र आणि पुराव्यांसहीत वर्णन आहे. उद्ध्वस्त ट्रॉय नगराचे अवशेष त्यात दाखवलेले आहेत. तसेच ऍकिलीज़ हेक्टरच्या मृत शरिराला आपल्या रथाच्या मागे बांधून नेतो असा प्रसंग चितारलेले कलशही त्यात दाखवलेले आहेत. ख्रिस्तपूर्व काळातल्या या युद्धाचे महाभारताशी असलेले साम्य थोडे चकित करणारे आहे हे निश्चित. या चित्रपटात केवळ शेवटच्या युद्धाचा परामर्श घेतला आहे.पण मूळात ट्रोय नगर ताब्यात घेण्यासाठी दहा वर्षांपासून संघर्ष चालू होता आणि
शहराच्या रचनेमुळे तसेच त्याच्याभोवतालच्या तटबंदीमुळे ते शक्य होत नव्हते.

वारंवार पाहूनही पुन्हा पहावासा वाटणारा हा चित्रपट आहे.

April 12, 2006

तरंग.. !!!

Filed under: Uncategorized — Giriraj @ 10:49 am

विविध घटनांचे पडसाद मनाच्या तळ्यात उमटतात! कधी मनाचा तळ ढवळून काढत तर कधी अगदी वरवरच तरंग उठतात.
असेच हे तरंग…..

गिरीश

Blog at WordPress.com.